म्हातारपण नको देगा देवा..
जीवन जगलो. खूप जगलो. सुखं बघीतली. दुःखही भोगली. आनंदाने सुखी सौनसार केला. पोरं लहानाची मोठी झाली. स्वप्नं पहिली. काही जगली ही. आता माझं वय झाल.
एके काळी जग इतक मोठ होतं. आता ते किती छोट झाल आहे. हा कोपरा. ही आराम-खुर्ची. तो खिडकी बाहेरचा नजारा. आता एवढच माझ छोटसं विश्व.
रोजचा कार्यक्रम - वर्तमान पत्र वाचायचे. डोळ्यांना आता स्पष्ट दिसत नाही. जितके दिसते तितके वाचतो. ह्या वर्तमान पत्रात आणि माझ्या जीवनात एकाच महत्वाचा काळ. तो म्हणजे वर्तमान. भूतकाळ म्हणजे आठवणींचा फक्त अफाट पसारा. आणि भविष्य-काळ? तो कोणी पाहिला आहे? उद्याचा सूर्य पाहायला मिळेल की नाही, कोणाच ठाऊक? त्याचा विचार करणं मी कधीच सोडलं आहे.
"देवा, सोडव रे बाबा आता", असं म्हणून म्हणून थकलो. पण तो देव काही माझं ऐकत नाही... जीवन भर तरी कोठे त्यानी इतकस ऐकलं, जो अत्ता ऐकेल? जीवन सुरळीत व्यथीत झाल, सर्वा कर्तव्ये पार पाडता आली, एवढी त्याची कृपा पुरे झाली की. आणखी मागू तरी किती त्याच्याकडे?
मेला तो चष्मा कोठे ठेवला? आठवत नाही. म्हातारपण हे अस असत बघा. स्मरणशक्ति कमी होते. रोजच्या गोष्टी आठवत नाहीत. आठवतो तो फक्त भूतकाळ. कधी तिची आठवण येते. इतकी वर्ष केलेला सौनसार, ते क्षण, आनंदाचे, आणि दुःखचे ही. कधी स्वताहाचं लहानपण आठवतं, तर कधी आमच्या शेंडेफळाच. ती माणस आठवतात. काही आपलीशी असूनही परकी झालेली माणस. पहिल्या वाहिल्या नातवाचं बालपण आठवते. अंगा खांद्यावर वाढवला त्याला. मोठा झाला आता तो. फार... काय म्हणतात त्याला? बीझी...? फार बीझी असतो तो. आजोबानकडे लक्ष द्यायला त्याला वेळ तरी कोठे? लहान पाणी मात्र आजी आजोबानशीवाय पान हालायचं नाही त्याचं... असो... मोठा हो, सुखी हो, यशस्वी हो, हिच श्रींकडे इच्छा.
खरा सांगू का? आता मला सर्वाचा कंटाळा आला आहे. कशात म्हणता कशात रस राहिलेला नाही. ना हिन्डण्यात रस राहिलेला. ना खाण्या-पिण्यात. ना वाचण्यात. ना गप्पा-गोष्टी करण्यात. आणि राहील तरी कसा? पाय दुखतात. सांधे-दुखीचा त्रास. म्हणून कोठे फिरू शकत नाही. उगाच पडलो वागेरे तर ओझं बनून राहायचो सर्वांसाठी, ही भीती. नाही तरी आता मी काही दिवसांचा आश्रित आहे. उगीच का कोणाला त्रास? बर काही चवीच खायच म्हटल तर, दातांनी साथ सोडून दिल्या पासून ते सुद्धा करता येत नाही. डोळ्यांना दिसत नाही. कानांनी कमी ऐकू येते. मग काय पुस्तकं वाचणार, नी काय तो टीव्ही बघणार? गप्पा मारायला आवडतील. पण ह्या म्हातार्याशी गप्पा मारायला कोणाला वेळ आहे?
आणि कुणी वेळ काढावा आपल्यासाठी अशी अपेक्षा तरी का करावी मी? त्यांना त्यांचं जीवन जगायचं आहे. माझं काय? जीवन जगून झालया. आता फक्त सुटकेची वाट पाहायची.
म्हातारं होण तसं वाईटच हो... शरीर साथ देत नाही. माणसे साथ सोडून जातात. स्वावलम्बी आणि स्वाभिमानी जीवन जगणारा माणूस, इतरांवर परावलंबी होऊन जातो. कधी कोणी तोडून बोललं तर गप-गुमान ऐकून घ्यावं लागतं. काही बोलल तर माझच तोंड वाईट. जीवनात रस रहात नाही. जेवणात गोडवा रहात नाही. ओझं होऊन जातो माणूस इतरांसाठी.
मग रोज वाट बघतो, कधी तो यमदूत येऊन सोडावतोय त्याची...
म्हातारपण नको देगा देवा, म्हातारपण नको देगा...

No comments:
Post a Comment